इतर

कोतुळ ते विहीर एसटी बस फेरी सुरु!

अकोले प्रतिनिधी

अकोले आगाराने कोतुळ ते विहीर( तळे) एसटी बस फेरीचा शुभारंभ केला यामुळे विद्यार्थि व आदिवासी भागातील प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे

दिनांक 26/9/ 25 पासून अकोले आगाराची एसटी बस सेवा विहीर ते कोतुळ सकाळी ९.३० वाजता सुटणार व कोतुळ मधून सायंकाळी ४.१५ वाजता विहिरीला जाण्यासाठी सुटणार याचा लाभ आंभोळ, महादेव वाडी, शिळवंडी, गंभीरवाडी,सोमलवाडी , कोहणे आणि विहीर तसेच कोथळा या भागातील प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे रामनाथ भोजने सामाजिक कार्यकर्ते सुनील भद्रीके संतोष साबळे व संत ज्ञानेश्वर विद्यालय शिळवंडी आणि आमलेश्वर विद्यालय आंभोळ यांनी पाठपुरावा केला प्रवाशांच्या मागणीनुसार आगार प्रमुख श्री सुरेश दराडे यांनी व कंट्रोलर देशमुख श्री ,गंभीरे यांनी दखल घेत ही फेरी सुरु केल्याने अकोले आगारचे प्रवाशांनी आभार मानले

अकोले- तळे या एसटी बस फेरी ची सुरवात झाल्याने संत ज्ञानेश्वर विद्यालय शिळवंडी विद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनीं नी एसटी चे चालक, वाहक यांचा सन्मान करत बस चे स्वागत केले या बस चा प्रवाशांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रामनाथ भोजने यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button