इतर

ज्ञानेश्वर डगळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!


राजूर प्रतिनिधी

निवारा बी द चेंज फाउंडेशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळाव्यासाठी राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
शिक्षक समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या वतीने फाउंडेशन तर्फे दरवर्षी या पुरस्काराने आयोजन केले जाते या वर्षीचा हा मानाचा सोहळा शिर्डीत पार पडला.


सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय विठ्ठलराव जपे, स्वरूप कापे ,निखिल वामन आदी मान्यवर यांचे हस्ते पार पडला. संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे
व अभिषेक सुपे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी राजूर . कोहोंडी येथील शिक्षक ज्ञानेश्वर डगळे यांनी शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक ,आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आनंदी फाउंडेशन यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देणेत आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड, अमित भांगरे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे, केंद्रप्रमुख स्वाती अडाणे, मुख्याध्यापक विकास कडाळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर किरवे, सरपंच हिराबाई तातळे,गोरख परते, पांडुरंग तातळे , ग्रामसेवक भैरवनाथ नाडेकर, प्रशांत डगळे आत्माराम तातळे, गवारी बाबा, आशा जाधव ,दिपाली लोहकरे, संतोष तातळे ,नलिनी किरवे, तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षक संघटना, मित्रपरिवार, विद्यार्थी ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button