आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२२/११/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०१ शके १९४७
दिनांक :- २२/११/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १७:१२,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १६:४७,
योग :- सुकर्मा समाप्ति ११:३०,
करण :- तैतिल समाप्ति ३०:२०,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१६:४७नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२८ ते १०:५२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०४ ते ०९:२८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३९ ते ०३:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०३ ते ०४:२६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
चंद्रदर्शन (१९:३२ प.), मु. ३० साम्यार्घ, भा. अग्रहायण मासारंभ, धनुरयन ०७:०५,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०१ शके १९४७
दिनांक = २२/११/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
जवळचा प्रवास कराल. बरेच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.
वृषभ
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.
मिथुन
कामातील उत्साह वाढेल. दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.
कर्क
उत्साह मावळू देऊ नका. कौटुंबिक कुरबुरीतून मार्ग काढावा. नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.
सिंह
महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तु मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.
कन्या
खर्च जपून करावा. सारासार विचार करूनच खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
तूळ
उष्णतेचे त्रास संभवतात. मनात अकारण निराशा निर्माण होऊ देऊ नका. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. काही अचानक येणार्या जबाबदार्या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता आहे.
वृश्चिक
कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा. थकवा जाणवेल. काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.
धनू
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे अधिक कल राहील. फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.
मकर
कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका. दिवसाची सुरुवात दमदार असेल. एक प्रकारची चुणूक दाखवाल. मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.
कुंभ
समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. धनलाभाची दाट शक्यता. कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन
मनात नसत्या शंका आणू नका. उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. दिवस उत्साहात जाईल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा माराल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



