इतर

पारनेर येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

:-पारनेर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे येत्या मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी निमित्ताने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


बुधवार, दिनांक २६ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत जागरण-गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर, सायंकाळी ७ ते ८ वाजता ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
हरिकीर्तनानंतर, रात्री ८ ते १० या वेळेत भाविकांसाठी शिपी, आमटी आणि भाकरीसह महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
पारनेर पोलीस स्टेशन समोर असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यवान कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा परिसरातील सर्व भाविक व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button