इतर

जेसीपी ने रस्ता उखाडल्याने अकोल्यातील गंभीरवाडी ची वाहतूक ठप्प!

अकोले प्रतिनिधी

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्यांसाठी शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे शेत शिवारातील शेत पानं द रस्ते खुले करण्याचे काम प्रशासकीय काम  जिल्ह्यात युद्ध पातळीवर  सुरू असतानाच खोडसाळ पणाने गंभिरेवाडी ( पैठण )ता अकोले  येथे पाच पिढ्याचा पाणंद वहिवाटीचा रस्ता एकाने   जेसीबी ने उखडून टाकला आणि  गावाचा  संपर्कच  बंद  केला आहे

      दि 25/12/2025 रोजी गंभिरेवाडी ( पैठण ) येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता तथाकथित जागा मालकाच्या खोडसाळपनामुळे jcb च्या साहाय्याने खोदला यामुळे  पैठण व राजूर कोतुळ कडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे .

       गंभिरेवाडीचा  हा  पाच पिढ्यांचा रस्ता आहे . 20 वर्षा पासून या ठिकाणी जिल्हा परिषदेची इयत्ता 1ली ते 6 वी पर्यंतचे वर्ग भरत आहेत ,

 रस्ता खोदल्याने  शाळेचे मुलांना ये जा करणे धोकादायक झाली आहे . शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली आहेत , गुरे व बैलांना जाणे मुशील होऊन ट्रॅक्टर व तत्सम छोटी वाहने जाऊ शकत नाही , शेती करणे अवघड होऊन बसले आहे . या वस्तीत शासनाच्या घरकुल योजनेतून काही कामे चालू आहेत तीही मटेरियल वाहतूक बंद झाल्यामुळे ठप्प झाली आहेत.या ठिकाणी एका सार्वजनिक मंदिराचे काम चालू असून त्यासाठी वाहतूक करणेही अडचणीचे झाले आहे .

त्यांच प्रमाणे वृद्ध माणसे , महिला , आजारी माणसे तथा गरोदर महिला यांना  वाहतूक खोळंबा झाला आहे ..

या रस्त्या मुळे  एखादा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही , सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाचा युद्ध पातळीवर पाठपुरावा करून  रस्ता तातडीने  करणे बाबत मागणी 

 नामदेव गंभिरे  अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती , महाराष्ट्र पुणे ,सह लक्ष्मण गंभिरे , मारुती गंभिरे , भिमाजी गंभिरे ,  सखाराम गंभिरे अनिल गंभिरे , सुनिल गंभिरे , भाऊसाहेब गंभिरे , दत्तात्रय गंभिरे , सुरेश गंभिरे ,सोमनाथ गंभिरे ,तुकाराम गंभिरे ,निवृत्ती गंभिरे , नानासाहेब गंभिरे , संजय गंभिरे , विकास गंभिरे , स्वप्नील गंभिरे , विठ्ठल गंभिरे , सुभाष गंभिरे , सीताबाई गंभिरे , शेवंताबाई गंभिरे  आदी सह ग्रामस्थांनी मागणी केली आहे

———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button