इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०१/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४७
दिनांक :- ०१/०१/२०२६,
वार :- ब्रुहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २२:२३,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २२:४९,
योग :- शुभ समाप्ति १७:१३,
करण :- कौलव समाप्ति १२:०७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पु. षा.,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५५ ते ०३:१८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त:- सकाळी ०७:०३ ते ०८:२५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३३ ते ०१:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५५ ते ०३:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त:- संध्या. ०४:४१ ते ०६:०३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रदोष, इ. स. २०२६ प्रारंभ, मृत्यू २२:४९ नं. ,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४७
दिनांक = ०१/०१/२०२६
वार = ब्रुहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
प्रवास चांगला होईल. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्वच्छतेवर अधिक भर द्याल. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

वृषभ
जोमाने कामे हाती घ्याल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत होईल. नवीन मित्र जोडाल. विचार योग्यरीतीने मांडाल.

मिथुन
मानसिक स्थैर्य जपावे. स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. हजरजबाबीपणा दर्शवाल. कौटुंबिक प्रश्न हाताळाल.बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

कर्क
हौस पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाच्या भारत कामे हाती घेतांना विचार करावा. कामाची दगदग जाणवेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

सिंह
सामाजिक जाणीवेपोटी कामे हातात घेतांना सारासार विचार करावा. काही गोष्टी उघडपणे बोलू नयेत. चुकीच्या कल्पना मनात बाळगू नका. क्षणिक सौख्य जपावे. मानसिक चंचलता जाणवेल.

कन्या
मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. कामात आळस करू नये. सुखासक्तपणा जाणवेल. कल्पकता दाखवता येईल.

तूळ
तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. व्यावसायिक गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे. कामाचे स्वरूप नीट समजून घ्यावे. प्रवासाची आवड पूर्ण कराल. खटपट करून कामे कराल.

वृश्चिक
वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान राखावा. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. उपासनेकडे लक्ष द्यावे. कामात हयगय नको.विशाल दृष्टीकोन ठेवावा.

धनू
काही कामे चटकन पार पडतील. अचानक धनलाभाची शक्यता. जवळच्या व्यक्तींशी होणारे गैरसमज टाळावेत. संयम बाळगावा. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील.

मकर
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. टोकाचा विचार करू नका. मतभिन्नता दर्शवू नका. भागीदारीत संयमाने वागावे.

कुंभ
कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

“मीन*
नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button