इतर

निसर्गसंवर्धन हा धागा हाती घेऊन तरुण पीढीने काम करावे – अभिनेते सयाजी शिंदे

राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर संपन्न

विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाचा संस्कार रुजवणारे शिबिर – प्रा . रंगनाथ पठारे


राजूर/प्रतिनिधी

रतनगड येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबीर उत्साहात संपन्न झाले ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठ पुणे , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व डॉ.डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ.डी.वाय. पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी , डॉ . डी . वाय . पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय,आकुर्डी व डॉ . डी . वाय . पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व्या राज्यस्तरीय  गिर्यारोहण शिबिराचे आयोजन २  ते  ५ जानेवारी २०२६ रोजी मौजे रतनवाडी, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य येथे करण्यात आले होते. सदर शिबिरात २७० विद्यार्थी तसेच १६ प्राध्यापक सहभागी झाले होते.
            या २९ व्या वर्षी च्या शिबिराच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सुप्रसिद्ध सिने अभिनेते व सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून निसर्ग संर्वधनाचे काम करणारे मा. सयाजी शिंदे, सौ .अलका शिंदे, शब्दालय प्रकाशनाच्या श्रीमती सुमती लांडे, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


    याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना मा . प्रा . रंगनाथ पठारे यांनी गिर्यारोहणाच्या माध्यामातून विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना करण्याचे संस्कार रुजवणाऱ्या मा . डॉ . मोहन वामन यांचे कौतुक केले तर सिने अभिनेते  मा . सयाजी शिंदे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी दशेत अशा धाडसी शिबिरांत सहभागी होण्याचे महत्त्व पटवून देत . निसर्ग संवर्धनासाठी तरुणाईने एकत्र येऊन काम करावे तसेच आपली दिशा योग्य असेल तर आपण जीवनात लवकर यशस्वी होते आणि त्यासाठी अशी शिबिरे होणे फार महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले.


सदर समारंभात पाहुण्यांचे स्वागत करताना ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन वामन यांनी शिबिराबद्दल  सांगताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून १९९७ पासून या रतनवाडी रतनगड कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबीराचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र राज्यातून आजपर्यंत जवळजवळ १५ ,५०० पेक्षा जास्त विदयार्थ्यांनी या शिबीरात सहभागी होऊन गिर्यरोहणाचे  व रॅप्लिंगचे प्रशिक्षण घेतले. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या तिथल्या आदिवासींना थोडा थोडका रोजगार मिळावा हा हे शिबिर घेण्यामागील उद्देश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.


प्रस्ताविकात डॉ. मिनल भोसले यांनी या शिबिराचा हेतू उद्देश सांगितला.सदर शिबिराचे आयोजन  डॉ . डी . वाय . पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाच्या कुलपती मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, प्र -कुलपती मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी मा .डाॕ. रोहीणीताई पाटील, ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन वामन, कुलसचिव डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्र- प्राचार्य डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले तर .
           या उपक्रमाच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, प्रा . नम्रता पायगुडे डॉ.मीनल भोसले , डॉ . खालीद शेख , प्रा.भागवत देशमुख, प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर,  प्रा. सतिश ठाकर, प्रा . करिश्मा सय्यद, प्रा. राहुल थोरात, प्रा. स्वाती मुळे,  प्रा. शुभांगी कुंभार, प्रा.शुभम मुर्तडक, प्रा . आकाश धावड यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button