इतर

सरकारमान्य देशी दारूचे दुकान बंद पाडण्याची धमकी देत उकळले 5 लाख 40 हजार,

अकोल्यात दोघा राजकीय कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल

अकोले प्रतिनिधी

वाघापूर( ता अकोले )येथील दोन मोठ्या राजकीय कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे

कोतुळ येथील एका देशी दारू विक्रेत्याला तक्रारी करून दुकान बंद पाडण्याची धमकी देऊन पाच लाख 40 हजार रुपये ची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर
अकोले पोलीसांनी गुन्हा रजि नं 20/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 308 (2),3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे

कोतुळ येथील सरकार मान्य देशी दारू दुकानाचे चालक शिवाजी तुकाराम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की मी देशी दारु विक्री व्यवसाय व शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोतुळ येथे देशी दारु विक्रीचा परवाना सी.एल ३ अनुज्ञप्ती क्र ६० हा नवनाथ भाउसाहेब डोंगरे रा. पांगरी ता. अकोले व माझ्यामध्ये भागीदारी तत्वावर सन २०१४ पासून आहे.

देशी दारु विक्रीचा परवाना सी.एल ३ अनुज्ञप्ती क्र ६० हा भाउसाहेब काशिनाथ डोंगरे रा. पांगरी ता. अकोले यांचे नावावर होता. सन २०१४ मध्ये त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, अकोले येथे सदर देशी दारु विक्रीचे पुर्ण हस्तांतरण त्यांचा मुलगा नवनाथ भाउसाहेब डोंगरे व माझ्या नावे केले आहे. दिनांक १०/०३/२०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय अकोले येथे मी व नवनाथ भाउसाहेब डोंगरे असे दोघांनी भागीदार करार केला आहे.
सदर भागीदारीमध्ये आपसात काही वाद निर्माण झाल्यास उपरोक्त दोन्ही भागीदार यांनी सदरील वाद मिटविण्याकरिता लवाद नेमुन लवादाने दिलेला निर्णय दोघांना मान्य राहिल. त्याप्रमाणे नवनाथ डोंगरे याचेकडे ४९ टक्के व माझेकडे ५१ टक्के प्रमाणे परवाना अधिकार असल्याचे नोंद असुन माझेकडे नेमलेल्या स्टाफ कडुन कोतुळ येथे देशी दारु विक्रीचा व्यवसाय करत असून मिळणारे वार्षीक उत्पन्नातुन भागीदार नवनाथ डोगरे यांना ४९ टक्के प्रमाणे रक्कम त्यांना रोख स्वरुपात देत असतो. भाउसाहेब काशिनाथ डोंगरे यांचे नातेवाईक महेंद्र रघुनाथ बराते व भाउसाहेब शंकर रकटे, रा. वाघापुर ता. अकोले हे असुन त्यांनी नवनाथ डोंगरे व माझ्या बरोबर झालेल्या देशी दारुच्या दुकानाच्या भागीदारी मध्ये यायचे असल्याने तसेच माझे सदर भागीदारीतून नाव काढून टाकण्याची धमकी देवून त्यांनी माझ्याशी वाद करुन वारंवार पैशाची मागणी करुन पैसे घेतले आहेत. त्यानंतर मी कर्जबाजारी झाल्याने मी त्यांना पैसे देवु शकत नव्हतो.


दि १३/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान मी पत्नी चित्रा, पुतण्या अभिषेक, भावकी चे दिपक गंगाधर देशमुख असे घरामध्ये असताना महेंद्र रघुनाथ बराते व भाउसाहेब शंकर रकटे दोघे असे माझे घरी
आले. मी त्यांना काय काम होते, असे विचारले असता भाउसाहेब शंकर रकटे हा मला म्हणाला की, “तुमचे दारु विक्रीचे दुकान व्यवस्थित चालु ठेवायचे असेल तर आम्हाला ५,४०,०००/- रुपये दयावे लागतील तेव्हा मी त्यांना कशाबाबत पैसे मागत आहात असे विचारले तसेच ठरलेल्या कराराप्रमाणे मी नवनाथ डोंगरे यास दर वर्षाचे पैसे देत आहे असे म्हणालो. तेव्हा त्यांनी मला नवनाथ डोंगरे याला सांगुन, “तुमच्या दारुच्या विक्रीचा परवाना हस्तांतराबाबत खोटया तक्रारी देवुन, तुमचे दारुचे दुकान बंद पाडायला लावीन” असे म्हणाला तसेच महेंद्र रघुनाथ बराते याने मला,”तुझा बेतच पाहतो ” असे म्हणून दोघांनी माझे दारु विक्रीचा व्यवसाय बंद व्हावा याकरीता माझे घरी येवुन मला पैशाची मागणी करुन पाहुन घेण्याची धमकी दिली. तेव्हा आम्ही घरातील उपस्थित सर्वांनी त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला परंतु त्यांनी आमचे काहीएक ऐकले नाही, तेव्हा मी माझा व्यवसाय व समाजातील प्रतिष्ठा याचा विचार करुन त्यांनी मागीतलेली रक्कम मला दयायची ईच्छा नसतानाही ५,४०,०००/- रुपये देण्यास तयार झालो.

दि. १४/०४/२०२४ रोजी एकनाथ तुकाराम खरात रा कोतुळ यांचे समक्ष ३,००,०००/- रुपये रोख स्वरुपात महेंद्र रघुनाथ बराते व भाउसाहेब शंकर रकटे यांचेकडे दिली.त्यानंतर दि. १७/०५/२०२४ रोजी परत राहीलेली रक्कम त्यांनी मागीतली. तेव्हा मी त्यांना मुदत थोडी मागीतली त्यानंतर पुन्हा दि. ०४/०७/२०२४ रोजी मी पुतण्या अभिषेक बाबासाहेब देशमुख असे कोतुळ गावात घरासमोरुन जात असताना त्यांनी मला थांबवून परत २,४०,०००/- रुपयांची मागणी केली, तेव्हा दि.०५/०७/२०२४ रोजी २,००,०००/- रुपये रोख स्वरुपात भाउसाहेब शंकर रकटे यांना दिले व दिनांक १९/७/२०२४ रोजी भाऊसाहेब शंकर रकटे यांचा मुलगा बाबासाहेब रकटे यांचेकडे ४०,०००/- रुपये रोख दिले दि.२५/०६/२०२५ रोजी मी, घरी असताना महेंद्र रघुनाथ बराते रा. कोतुळ व भाउसाहेब शंकर रकटे रा. कोतुळ हे पुन्हा माझेकडे आले व मला म्हणाले की,

मा. जिल्हाधिकारी सो, अहिल्यानगर व आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच मा. अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांना नवनाथ डोंगरे व
भाउसाहेब डोगरे यांना सांगुन त्याच्या मार्फतीने तुमचे दारु विक्रीचे दुकान हस्तांतरण बाबत तक्रारी करुन तुमचे दारु विक्रीचे दुकान बंद पाडु असे बोलून ५,००,०००/- रुपयांची मागणी करून पैसे दिले नाहीतर तुझे जगणे मुश्कील करु अशी धमकी दिली.
तसेच मी व नवनाथ भाउसाहेब डोंगरे असे दोघांनी भागीदार करार केला त्यामध्ये नवनाथ डोंगरे याचेकडे ४९ टक्के व माझेकडे ५१ टक्के प्रमाणे परवाना अधिकार असल्याचे नोंद आहे, तरी महेंद्र रघुनाथ बराते व भाउसाहेब शंकर रकटे हे मला समक्ष भेटुन नवनाथ डोंगरे व माझ्यात झालेली भागीदारी ही खोटी असुन आम्हाला न विचारता केलेली आहे. त्यामुळे दारु विक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद पाडु असे धमकी दिली आहे. तरी महेंद्र रघुनाथ बराते रा. कोतुळ व भाउसाहेब शंकर रकटे रा. कोतुळ यांनी वेळोवेळी माझे घरी तसेच बाहेर भेट्न माझे दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची धमकी देवून माझेकडुन इच्छा नसतानाही मला वारंवार पैशांची मागणी करून ५,४०,०००/- रुपये माझेकडुन घेतले असुन त्याबाबत चे संभाषण असलेला पेनड्राईव्ह मध्ये देत आहे.
माझा देशी दारु विक्रीचा चालु असलेला व्यवसाय नवनाथ डोंगरे व भाउसाहेब डोंगरे यांना सांगुन, “तुमचे दारु विक्रीचे हस्तांतरणबाबत जिल्हाधिकारी सा अहिल्यानगर व आयुक्त यांना तक्रारी देवुन दारु विक्रीचा व्यवसाय बंद पाडु • असे म्हणून आणखी ५,००,०००/- रुपये दया आम्ही दिलेल्या तक्रारी मागे घेतो असे म्हणुन, पैसे दिले नाहीतर दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी बंद पाडु” असे म्हणून मला पाहुन घेण्याची धमकी दिल्याने
तसेच माझे दारु विक्रीचे व्यवसायावरुन मला वारंवार पैशांची मागणी करुन खंडणी मागत असल्याने माझी त्यांच्याविरुदध कायदेशीर तक्रार असल्याचे फिर्यादी शिवाजी तुकाराम देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे

ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब रकटे, वाघापूरच्या महिला सरपंच यांचे पती महेंद्र बराते यांचे वर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button