इतर

कल्याण शहरात आदिवासी भवन निर्माण व्हावे आदिवासी संघटनांनीं केली मागणी

कल्याण प्रतिनिधी

कल्याण शहरात आदिवासी भवन निर्माण व्हावे अशी मागणी आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नूतन महापौर ॲड.हर्षालीताई चौधरी थविल यांच्याकडे केली.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नूतन महापौर ॲड.हर्षालीताई चौधरी थविल यांचा आदिवासी समाजाबांधव आणि संघटनां प्रतिनिधींनी अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला सत्कार केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर दालनात आदिवासी समाज बांधव महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई विभाग ,आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था अधिकारी कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका , संयुक्त उत्सव समिती कल्याण , बहुजन कर्मचारी महासंघ कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने महापौर हर्षालीताई यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मानाची फडकी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

समाज बांधवांनी कल्याण शहरामध्ये आदिवासी भवन निर्माण व्हावे अशी मागणी आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधिनीं केली

सदर प्रसंगी अध्यक्ष भागाजी भांगरे, किशोर शेळके सचिव महानगरपालिका,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई अध्यक्ष रामनाथ भोजने, नगरसेविका शीतल मंढारी, उपयुक्त सविता हिले मॅडम, ऑडिटर चारुशीला मेमाणे, अध्यक्ष पोळ साहेब, सुरक्षा अधिकारी भारत बुळे ,अग्निशामक अधिकारी चौधरी साहेब,शशिकांत महाले कक्षाधिकारी,अभिमान पवार, भरत पाटील साहेब, अनिल गावित साहेब, सागर धामोडे, बाळकृष्ण कोरडे, शिक्षक दिगंबर नवाळे इतर मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button