आजचे पंचांग व राशी भविष्य दि -२०/०२/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०१ शके १९४७
दिनांक :- २०/०२/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १४:३९,
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति २०:०८,
योग :- साध्य समाप्ति १८:२३,
करण :- वणिज समाप्ति २५:५२,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ११:१६ ते १२:४३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहर्त — सकाळी ०८:२२ ते ०९:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४९ ते ११:१६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:
भा. फाल्गुन मासारंभ, अमृत २०:०८ नं., भद्रा २५:५२ नं., तृतीया – चतुर्थी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०१ शके १९४७
दिनांक = २०/०२/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
हौसेचे मोल लक्षात घ्याल. कामावर अधिक लक्ष केन्द्रित कराल. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल.
वृषभ
बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. दिवस घाईगडबडीत जाईल. मित्रांशी पैज लावाल.
मिथुन
घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
कर्क
भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल.
सिंह
भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्या. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. सामाजिक संबंध जपावेत.
कन्या
काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत.
तूळ
आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी.
वृश्चिक
नातील इच्छा पूर्ण होईल.मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील.
धनू
कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे.
मकर
थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल.
कुंभ
योग्य संधीची वाट पहावी. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.
मीन
जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापुर



