पुणे आंतरराष्ट्रीय कार्टून महोत्सव साठी अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्राची निवड

संगमनेर – पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून तिसरा पुणे आंतरराष्ट्रीय कार्टून महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होत आहे. कार्टूनिस्ट कंबाइन महाराष्ट्र या संस्थेने हे आयोजन केले असून या महोत्सवात संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्राची निवड झाली आहे.
अमेरिका,इराक, इटली,आर्मेनिया, स्विडन, रशिया,ब्राझील, चीन, तुर्की,अर्जेंटिना,ब्राझील सह इतर देशातल्या १५१ व्यंगचित्रकार व ६२ व्यंगचित्रकार भारतातील गोवा,कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा,केरळ,काश्मीरसह इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील ६९ व्यंगचित्रकारांनी या मोहात्सवात सहभाग घेतला आहे.
युद्ध,महागाई,पर्यावरण,शिक्षण,सोशल मीडिया या विषयावर व्यंगचित्र मागवली होती.
गाडेकर यांनी १२२०० व्यंगचित्र साकारून ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केले असून ११००० व्यंगचित्र साकारलेबद्दल ‘महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड ‘मध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यांची व्यंगचित्रे अनेक दैनिक,मासिक,साप्ताहिक,दिवाळी अंकातून प्रसिद्ध होत असून सोशल मीडियावरील व्यंगचित्रांना विशेष चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



