आदिवासी कृती समितीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
राजूर प्रतिनिधी
आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र, पुणे व आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने राजूर येथे अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आदिवासी समाज कृती समिती व स्वप्नदूत यांच्या वतीने ॲड .देशमुख महाविद्यालय येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणजी भूरकुंडे. होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नितीन चंदनशिवे कवी व दंगलकार, वन अधिकारी दत्तात्रय पडवळ, पर्यावरण प्रेमी राहुल राऊत, साधन परिवार अध्यक्ष संजय गोडे, ह भ प नानासाहेब गंभीरे ,ॲड पोपरे , सी के भांगरे यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख मनोगत व्यक्त करताना नितीन चंदनशिवे यांनी करताना सांगितले की, समाजातील या वाईट प्रवृत्ती कितीही विषारी असल्या तरी लोकशाही मजबूत करण्याचे साधन ” संविधान ” हेच असून सर्व जाती – धर्माच्या पलीकडे जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात मा चंदनशिवे यांनी लाडक्या कवितेतील ” कांबळे नाही रडला – नुसता कन्हला “. या सुंदर कवितेतून आपल्या पुढे एक आदर्श निर्माण करतील.आदिवासी समाज जगातील सर्वात जुना असून त्यांना मूळ निवासी समजले जाते. तसेच ते सहनशील आणि तेवढेच प्रामाणिक आहेत.
अध्यक्षीय भाषणात भुरकुंडे यांनी सांगितले की,हुशारी असूनही योग्य संधी मिळाली नाही. जिद्द व चिकाटी असल्यास कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाला तरी संधीचं सोनं करता येतं. स्पर्धा परीक्षेची तयारी दहावीपासूनच सुरू करावी.
प्रास्ताविक आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजी. नामदेव गंभिरे यांनी संस्थेच्या कार्याचा 38 वर्षांचा आढावा विषद करून सांगितला. या कार्यक्रमात सुमारे विद्यार्थ्यांना ट्रॉफी, आणि रोख रकमेचं वाटप करण्यात आलं. यावेळी कार्याध्यक्ष किसन भोजने, सुदाम चपटे, गंगाराम सांगाडे,डॉ चंद्रकांत लहामटे, दीपक गंभीरे, सचिन भांगरे, अनिता गोडे, डॉ. प्रदीप अंबावणे, प्रशांत शिंगाडे लक्ष्मण भालेकर, सतीश लेंभे एकनाथ बुरसे, धुंदा मोरे दिनकर शेळकदे, सिताराम जोशी संस्थापक संचालक, सागर गंभीरे ऋतुजा गंभीरे अशोक भवारी,ज्ञानेश्वर घाटकर ,प्रवीण घिघे किसन पडोळे, विठ्ठल गंभीरे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी कृती समितीच्या वतीने चंदनशिवे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. स्वप्नदूत फाउंडेशन अध्यक्ष सुनील भांगरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन विकास गंभीरे कु.प्रणिता गोडे ,संजय गंभीरे यांनी केले आभार प्रदर्शन दीपक गंभीरे यांनी केले.
=====

