सरकारी कामात अडथळा भा दं वी कलम ३५३ चा.. गैरवापर टाळा!

संगमनेर प्रतिनिधी
शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वापरण्यात येणारे भादवि कलम 353 या कलमाचा सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी केला आहे
सरकारी कामात अडथळा भा दं वी कलम ३५३ शस्र नव्हे संरक्षणा साठी अस्र. त्याचा . .. गैरवापर टाळा!
साईबाबा संस्थान शिर्डी चे अधिनियम कलम ३१ प्रमाणे संस्थानचा कर्मचारी लोकसेवक आहे.. संस्थान मध्ये एक भरकटलेला जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आला आणि शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये खोट्या ३५३ च्या गुन्ह्यांचा सुळसुळाट वाढला..
गावकरी व मुख्य कार्यकारी यांचे दर्शना वरून वाद झाले तीन दिवस सरकारी कामात अडथळा धमक्या चालू होत्या
पत्रकार नितिन ओझा यांचे व मुख्य कार्यकारी यांचे वाद झाले .. तात्काळ जुन्या मागील तारखेची एक घटना काढून त्यांचेवर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल..
मी माहितीच्या अधिकारात माहीती मागवतो म्हणून माझ्या विरूध्द दोन कर्मचाऱ्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला ३५३ च्या मागच्या तारखेच्या घटना दाखवत फिर्यादी दाखल केल्या.. भाग्य माझे मला सुरक्षा पोलीसांचीच असते रोज
एका राजकिय नेत्याने कोव्हिड काळात कामगारांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस केले.. आठ दिवसाने त्याचे विरूध्द गुन्हा दाखल..मी हार फुले चालू व्हावे म्हणून सत्याग्रह केले माझ्या वर ३५३ दाखल करण्यासाठी मंदीर व्यवस्थापनाने मोठे षडयंत्र रचले होते..फुलां साठी सत्याग्रह करणाऱ्या नागरिकांवर घटना घडल्यानंतर चार दिवसांनी ३५३ चे गुन्हे दाखल केले संस्थानने..काल नव्याने एका पत्रकारावर ३५३ एक महिना उशिराने दाखल झाला..
जर खरच सरकारी कामात अडथळा झाला तर राजपत्रीत जिल्हाधिकारी दर्जाचे मुख्य कार्यकारी महिनाभर गुन्हे का दाखल करीत नाही..
यांच्या भ्रष्टाचाराचे जवळ कुणी पोहचतोय असे कळले की लगेच खोटे गुन्हे दाखल होतात.. ही संस्थान व शासनाची बदनामी आहे.. सातवा वेतन आयोग केवळ अन्याय करण्यासाठी नाही.. शासकिय कर्मचारी व अधिकारी यांना भा दं वी कलम ३५३ हे सुरक्षा कवच आहे.. गैरवापरासाठी दिलेले शस्र नाही
सुडातून खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे एखाद्या चांगले काम करणाऱ्याचे पारितोषिक हूकते.. त्याचा व्हिसा नाकारला जातो.. त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून बघितले जैते बदनामी होते.. एखादा होतकरू तरूण पात्रता असून सरकारी नोकरी पासून वंचित राहतो..
काही शासकिय अधिकारी , कर्मचारी यांना हि विकृती लागली आहे कि काय? .. या विकृतीचा मीच तीन वेळेस भक्ष ठरलो.. दोन वेळेस कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे गुन्हे दाखल झाले नाही हे भाग्य.. पण ज्यावेळेस मला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागत त्यावेळेस सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल आहे हे लिहून प्रतिमा मलिन करून घ्यावी लागली.. पण राजकिय सुडा साठी नेत्यांचे बाहूले होऊन खोटे ३५३ दाखल होऊ नये.. याची लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तिर्ण होणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी..३५३ ह्या कवचाचा शस्र म्हणून वापर करू नये .. असेआवाहन
संजय भास्करराव काळे यांनी केले आहे



