इतर

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नगर येथे सावता परिषदेचे अधिवेशन !

पारनेर तालुक्यातील समाजबांधवांनी उपस्थित रहावे -अमृतशेठ रसाळ

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
सावता परिषदेच्या वतीने शनिवार दि.४ रोजी होत असलेल्या ५ व्या त्रैवार्षिक अधिवेशनास पारनेर तालुयातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माळी महासंघाचे जिल्हा पदाधिकारी व मंळगंगा कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांनी केले आहे.
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सावता परिषदेचे अधिवेशन शनिवार दि.४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता अहमदनगर येथील न्यू टिळक रोड नंदनवन लॉन्स येथे होत असून माळी समाज बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक या अधिवेशनात करण्यात येणार आहे. सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य , प्रदेश उपाध्यक्ष राहुल जावळे, जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, सचिव रामेश्वर पुंड यांनी याबाबत सांगितले की या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राउत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर,समर्थ अकॅडमीचे संचालक कैलास गाडीलकर सर , ज्येष्ठ नेते शंकरराव बोरकर तसेच जिल्ह्यातील मान्यवर समाज बांधव व जिल्हा समता परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी व मळगंगा कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button