आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १०/०८/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १९ शके १९४७
दिनांक :- १०/०८/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:११,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५८,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १२:११,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति १३:५३,
योग :- शोभन समाप्ति २४:०२,
करण :- तैतिल समाप्ति २३:२५,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:२२ ते ०६:५८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि, द्वितीया श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १९ शके १९४७
दिनांक = १०/०८/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.
वृषभ
कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. एखादी चांगली बातमी मिळेल.
मिथुन
तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.
कर्क
पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
सिंह
अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या
कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.
तूळ
महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.
वृश्चिक
कामात अधिक उत्साह वाटेल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.
धनू
खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
मकर
जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.
कुंभ
जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्यांना सोबत कराल.
मीन
उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



