आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १५/०८/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २४ शके १९४७
दिनांक :- १५/०८/२०२५,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति २३:५०,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति ०७:३६, भरणी ३०:०६,
योग :- गंड समाप्ति १०:१७,
करण :- विष्टि समाप्ति १२:५९,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५८ ते १२:३४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४७ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३४ ते ०२:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्षारंभ सन १३९५, दग्ध २३:५० नं., भद्रा १२:५९ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २४ शके १९४७
दिनांक = १५/०८/२०२५
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
आज वैवाहिक जीवनात अडथळे येतील. व्यवसायात काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला सावध राहावे लागेल. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल. पैसे खर्च होतील. ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल.
वृषभ
आज व्यवसायात अडथळे निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशेचा सामना करावा लागेल. व्यवहारापासून दूर राहा. नुकसान होऊ शकते.
मिथुन
आज तुमच्या कार्यक्षेत्रात सूचनांचे स्वागत केले जाईल. तुमचे मन प्रसन्न राहिल. कोणतेही अवघड काम सहज पूर्ण होईल. एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमची रचनात्मक कार्यात रुची वाढेल. आर्थिक लाभ होतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मनाचे ऐकावे. फसवणुकीला बळी पडू नका.
कर्क
आज विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून आवश्यकते सहकार्य मिळेल. कौटुंबिक व्यवसायात भावाची मदत मिळेल. चांगल्या कामावर पैसे खर्च कराल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. काही समस्यांना सामोरे जावे लागेल.
सिंह
आज नवीन व्यवसायात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. शत्रूमुळे नुकसान होईल. सामाजिक कार्यक्रमात तुमची कीर्ती पसरेल. आरोग्याची काळजी घ्या, त्रास वाढू शकतो.
कन्या
आज भावाच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. व्यवसायात जास्त घाई गडबड करु नका. हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होईल. ज्यामुळे चिंतेत सापडाल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
तूळ
आज तुमची अध्यात्माची आवड वाढेल. नोकरीशी संबंधित लोकांना मेहनत करावी लागू शकते. तुमचे काम बिघडेल. व्यवसायात मोठी डील फायनल झाल्याने फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून चांगला जाईल. कौटुंबिक व्यवसायासाठी काही योजना कराल. त्यात तुम्हाला यश मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर एखाद्या प्रकल्पावर काम कराल. आर्थिक लाभ मिळू शकतो.
धनु
आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एकामागून एक नवीन कामे करावी लागतील. तुम्ही व्यस्त असाल. कुटुंबातील लोकांसाठी वेळ काढू शकणार नाही. आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. शुभ कार्यक्रमाबाबत चर्चा होऊ शकते. भावांसोबत मतभेद असतील तर ते संपतील.
मकर
आज कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणताही वाद आज सुटू शकतो. एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल.
कुंभ
आज घाईत कोणता निर्णय घेऊ नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. व्यवहाराबाबत सावध राहा. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात नुकसान होऊ शकते.
मीन
आज तुमची समस्यांपासून सुटका होईल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. आजची कामे उद्यावर ढकलू नका. शत्रू तुम्हाला त्रास देतील.



