इतर

रंधा येथील अवैध दारू बंद करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या रंधा गावात अवैध दारू व ताडी माडीची सुरु असलेली अवैध विक्री तातडीने बंद करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे तालुका युवा अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे

रंधा येथे अवैध देशी- विदेशी दारू तसेच ताडी माडीची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे या अवैद्य दारूमुळे अनेक जण व्यसनी होत आहे याशिवाय अवैध दारू विक्री करणारे बनावट दारू विकत असल्याने बनावट दारू विकून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे बनावट दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने ही दारू विक्री बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे गावचे सरपंच तसेच पोलीस पाटील यांनी याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी श्री विजय पवार यांनी केली आहे याबाबत वेळीच दखल न घेतल्यास आपण वरिष्ठांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button