इतर

उद्योजक दत्तात्रय साळुंके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

दत्ता ठुबे /पारनेरप्रतिनिधी :
वासुंदे गावातील युवक सहकारी वीरा इन्फ्रा कंट्रक्शनचे संस्थापक दत्तात्रय साळुंके यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वासुंदेकर ग्रामस्थांनी आणि सहकारी मित्रांनी शुभेच्छा देत सन्मानित केले. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून तसेच सामाजिक कामांमधून गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या साळुंके यांनी अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि समाजाप्रती बांधिलकीची प्रशंसा सर्वत्र होत आहे.


वासुंदे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साळुंके यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इंजि. प्रसाद झावरे, अमोल पोटघन, योगेश रोकडे, स्वप्निल झावरे, बापूसाहेब गायखे, उत्तम तळेकर, अमोल शिंदे, माऊली ठुबे, सुरेश शिंदे, बाबाजी हिंगडे, किरण पोपळघट, ऋषिकेश झावरे, अरुण वाबळे, दत्तात्रय उगले, गणेश झावरे, किरण साळुंके, किरण चेमटे, अमोल साठे, विकास मोरे, सागर साळुंके, सागर दाते, अनिल हिंगडे, नामा दाते, साहेबराव झावरे, तोफिक राजे, दीपक शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि सहकारी मित्र उपस्थित होते.
उद्योजक दत्तात्रय साळुंके यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावातील तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे वासुंदे गावाचा नावलौकिक वाढला आहे. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभकामना दिल्या. साळुंके यांनी सर्वांचे आभार मानत गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

उद्योजक दत्तात्रय साळुंके एक शांत संयमी सुस्वाभावी आणि अपार कष्टातून यशाला गवासणी घालणारे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक बांधिलकी जपत युवा वर्गाला प्रेरणा देत स्वतःचे अस्तित्व निर्माण करून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.

अमोल पोटघन (वासुंदे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button