रंधा येथे शेतकरी प्रशिक्षण संम्पन्न

अकोले प्रतिनिधी
एएसके फाऊंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ(BISLD) नाशिक संचालित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत आज दिनांक 21.8.2025 रोजी रनद (रंधा ) या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवड बद्दल सखोल असे मार्गदर्शन बायफ चे प्रकल्प समन्वयक राम कोतवाल यांनी केले .
स्ट्रॉबेरी लागवड हंगाम, कोणत्या जातीची निवड करायची, त्यासाठी जमिनीची निवड पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी गादीवाफे, ठिबक सिंचन, मलचिंग पेपर, योग्य निरोगी रोपांची निवड, पाणी, खत व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण, पिकाची काढणी, पॅकिंग, विक्रीव्यवस्था, पिकाची लागवडी पासून ते विक्री पर्यंत पूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

उपस्थित महिला, शेतकरी यांना माहितीपत्रक देण्यात आले.तसेच फळबाग लागवड संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ASK फाऊंडेशन मुंबई यांचे प्रोजेक्ट मॅनेजर अरुण बांबळे यांनी आदर्श गाव संकल्पना मांडली, त्यासाठी गावचा लोकसहभाग कसा महत्वाचा असतो यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच बायफ संस्थेचे प्रकल्प प्रमुख श्री विष्णु चोखंडे, यांनी प्रकल्प संदर्भात माहिती दिली. तसेच मोठादेव ग्राम विकास समितीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, ग्रामविकास अधिकारी काकड साहेब, व बायफचे सौरभ खाडे, मच्छिंद्र मुंढे, काजल देशमुख, वर्षा भागडे तसेच मोठ्या प्रमाणात बचत गटातील महिला आणि शेतकरी सहभागी झाले होते.
या कार्यक्रम चे नियोजन एएसके फाऊंडेशन मुंबई चे सिद्धार्थ आयर साहेब (Assistant Vice president), बायफ संस्थेचे मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक प्रदीप खोसे साहेब, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे यांचे मार्गदर्शन खाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठादेव ग्रामविकास समिती चे अध्यक्ष मधुकर पटेकर यांनी केले तर आभार गावचे सरपंच सुंदरलाल भोईर यांनी मानले.



