इतरशिक्षण व आरोग्य

टाकळी लोणार येथील साईकृपा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरावर कुस्ती स्पर्धेत यश

अहिल्यानगर दि 9 श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील साईकृपा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कुस्ती स्पर्धेत तालुका स्तरावर यश

अरमान अन्सार खानचा १७ वर्षे वयोगटात ४५ किलो वजनगटात, तर ओंकार मोहन कदमचा १७ वर्षे वयोगटात ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक

टाकळी लोणार येथील साईकृपा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी अरमान अन्सार खान (इ. ९ वी) व ओंकार मोहन कदम (इ. १० वी) यांनी परिक्रमा क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अरमान अन्सार खान याने १७ वर्षे वयोगटात ४५ किलो वजनगटात, तर ओंकार मोहन कदम याने १७ वर्षे वयोगटात ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे, सचिव सौ. अर्चनाताई दत्तात्रय पानसरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिलीप पानसरे सर, सर्व सेवकवृंद व ग्रामस्थांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे साईकृपा विद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button