नवरात्र उत्सवानिमित्त कोतुळ ला मुक्ताई माता मंदिरात हरिनाम सप्ताह

कोतुळ प्रतिनिधी
ग्रामदैवत मुक्ताई माता मंदिर कोतूळ (ता अकोले जिल्हा अहिल्या नगर) येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन केले आहे
ह.भ.प.रामनाथ महाराज जाधव व ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे मार्गदर्शनाखाली
मिती अश्विन शु. ६ शके १९४७ रविवार दिनांक : २८.०९.२०२५ ते मिती अश्विन शु.९ बुधवार दिनांक : ०९.१०.२०२५ पर्यंत आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
- पहाटे ४.३० वा. : काकडा सकाळी ८ ते ११.३० : देवी महात्म्य पारायण
- दुपारी २ ते ४ वा. : नेमाचे भजन
- सायं. ५.३० ते ६.३० वा. : हरिपाठ रात्री ७ ते ९.३० वा. : हरिकिर्तन रात्रौ ९.३० ते १० वा. : महाप्रसाद
- असा दैनिक कार्यक्रम पार पडणार आहे
या दरम्यान ह.भ.प. अर्पिताताई आमराळे (बारामती) झी टॉकिज मन मंदिरा फेम
ह.भ.प.भागवताचार्य अंजलीताई केंद्रे उदगीरकर
प्रदेशाध्यक्ष, अखिल वारकरी संघ आघाडी, महाराष्ट्र राज्य ह.भ.प.भागवताचार्य सोनालीदिदी महाजन आळंदी ह.भ.प.संगितअलंकार संगिताताई चोपडे (पुणे)
यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामदैवत मुक्ताई माता मंदिर देवस्थान व ग्रामस्थांनी केले आहे



