राजा हरिश्चंद्र विदयालय व जि. प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी येथे महात्मा गांधी जयंती साजरी

एस के जाधव
कोकणवाडी ता अकोले दि 3
राजा हरिश्चंद्र माध्यमिक विदयालय व जि. प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना संबोधीत करताना ते म्हणाले, ” महात्मा गांधीजींचे कार्य महान असून देशासाठी त्यांचे योगदान फार मोठ आहे. . त्याच बरोबर या दिवशी देशात ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते. आपले घर, गाव, विद्यालय अशा ठिकाणी स्वच्छता केली जाते. “
अशा प्रकारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच जयंती निमित्त विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले.
श्री घनशाम नवले यांनी महात्मा गांधीजींचे कार्य व विजया दशमी दसरा सणाचे महत्त्व सांगितले

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल बाबा धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री तुळशिराम गभाले , श्री सुधाकर भांगरे, श्री संतु जाधव, श्री घनशाम नवले , श्री तुकाराम बेणके, श्री विजय बढे कर्मचारी श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे तसेच पालक उपस्थित होते. शेवटी तुकाराम बेणके यांनी उपस्थितांचे आभार मानले.




