इतर

आबिटखिंड (ता. अकोले) येथील मराठी शाळेत विद्यार्थांना स्पोर्ट्स ड्रेस चे वाटप


अकोले, ता. 19 : आदिवासी भागातील सर्व मुलांना इंग्रजी शाळेतील मुलांप्रमाणे सोयी सुविधा मिळाव्यात. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे. आदिवासी दुर्गम भागातील मुलांनाही शाळेत चांगल्या सुविधा मिळाल्या तर त्यांचे मन शाळेत रमेल त्यासाठी त्या शाळेत काय कमी आहे त्याची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थांनी त्यांना त्या सुविधा पुरवल्या तर त्याचा फायदा मुलांना होईल असे प्रतिपादन वाघोली येथील पोस्टमन सामाजिक कार्यकर्ते शिवदुर्ग ट्रेकर्सचे नामदेव गवळी यांनी केले.

आबिटखिंड (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पोर्टस ड्रेस, फटाके, मिठाई वाटप कार्यक्रमात बोलत होते. हे वाटप पोस्टमन नामदेव गवळी यांनी लोक सहभागातून केले.

यावेळी वाघोली येथील बांधकाम व्यावसायिक अक्षय ढोरे, गणेश लगड, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मुठे, आदिवासी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विजय घनकुटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर घनकुटे, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, सोमनाथ मुठे निलेश गोडे, अनिल भोजने, दिपक घनकुटे, सचिन घनकुटे, पुनाजी भोजने, धोंडिबा भोजने, सविता सांगडे, विद्या शिंदे, जिजाबाई तिटकरे, मंगल भांडकोळी, यशोदा घनकुटे, कमल भांडकोळी आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच प्रकारचे साहित्य वाटप फोपसंडी प्राथमिक शाळेतही करण्यात आले.

नामदेव गवळी म्हणाले …
अडचणीत आलेल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे. समाजात अशा लोकांना मदत करणारे अनेक हात आहेत त्यांच्या पर्यंत आपण पोहोचले पाहिजे व ती मदत योग्य व्यक्ती पर्यंत गेली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत असतो. दरवर्षी मी या माध्यमातून साधारणतः तीन हजार मुलांना विविध प्रकारची मदत करत असतो. यात शैक्षणिक साहित्य, गणवेश, सायकल, शिक्षणासाठी आर्थिक मदत मी करत असतो. आणि ती मदत मी मुलांपर्यंत पोहोच करण्याचे काम करत असतो.

यावेळी विजय घनकुटे, राजेंद्र उकिरडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मुठे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार सोमनाथ मुठे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button