आजचे पंचांग व राशी भविष्य, दि.२१/१०/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २९ शके १९४७
दिनांक :- २१/१०/२०२५,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति १७:५५,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति २२:५९,
योग :- विष्कंभ समाप्ति २७:१६,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति –:–,
चंद्र राशि :- कन्या,(०९:३६नं. तुला)
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:०८ ते ०४:३४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१४ ते ०१:४१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०८ ते ०४:३४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
लक्ष्मी कुबेर पुजन, दर्श अमावास्या, महावीर निर्वाण दिन, अलक्ष्मी निस्सारण, अन्वाधान,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २९ शके १९४७
दिनांक = २१/१०/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल.
वृषभ
आपल्या वर्तनावर कोणी संशय घेणार नाही याची काळजी घ्या. सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक खर्च चिंतेत टाकू शकतो. मनाची चंचलता जाणवेल.
मिथुन
मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल.
कर्क
आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.
सिंह
जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल. मुलांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील.
कन्या
लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी. काही घटनांमुळे ताण वाढू शकतो. अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते.
तूळ
बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगवे.
वृश्चिक
लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कर्ज मुक्तीसाठी प्रयत्न कराल. प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल.
धनू
कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदी बाबत चर्चा कराल.
मकर
तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पार पाडाल.
कुंभ
रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल. अधिकार्यांच्या सहकार्याने समस्या दूर होईल.
मीन
व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असू शकते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



