नवराष्ट्र जनसेवक पुरस्कारप्राप्त मा. अनंत घाणे यांचा भव्य सत्कार वारंघुशी ग्रामस्थ व मा .आ.वैभव पिचड यांच्या हस्ते सत्कार

राजूर (प्रतिनिधी) : नवराष्ट्र जनसेवक पुरस्काराने सन्मानित झालेले जनसेवक मा. अनंत महादू घाणे यांचा वारंघुशी ग्रामस्थ व माजी आमदार वैभव पिचड यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. वैभवराव पिचड होते. यावेळी पांढरे पाटील,तुकाराम खाडे, अध्यक्ष भरतजी घाणे, सरपंच सागर रोंगटे, सुरेश गभाले, गंगाराम धिंदळे, सरपंच अनिता कडाळी, सुनील मधे आदींनी मनोगत व्यक्त करून जनसेवक अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा तळगातील समाजातील गोरगरीबांची सेवा करत काम करत असल्याने गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती अनंत घाणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “हा पुरस्कार माझा नसून सर्व समाजाचा आहे. हा सन्मान मी माझ्या स्वर्गीय आई-वडिलांना व वंदनीय कै. मा. मंत्री मधुकरराव पिचड यांना समर्पित करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आ वैभव पिचड यांच्या सहकार्याने मी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केले. रस्ते, वीज, रेशन, भातपिकांची नुकसानभरपाई, रास्ता रोको, अतिवृष्टीतील पंचनामे अशा अनेक जनहिताच्या प्रश्नांवर आम्ही प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला.”

अध्यक्षीय भाषणात माजी आ. वैभव पिचड यांनी अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत म्हटले की, भातपिकांचे नुकसान, रस्त्यांची दुरवस्था, रेशन वितरण, पिक विमा रस्ता रोको आदिवासी समाजात घुसखोरी यासाठी रस्त्यावर उतरत यांसारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अनंत घाणे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्या कार्याची परंपरा आम्ही पुढे चालवली आहे.”
कार्यक्रमास उपस्थित उंबरे पाटील, एकनाथ सारुकते, तुकाराम सारुकते, हनुमंत मुळे, अमृता झडे, सिताराम खाडे, सयाजी असवले. उघडे सर, नामदेव बांडे. मारुती बांडे.
कुंडली घारे . सरपंच फसाबाई बांडे. पंढरीनाथ खाडगीर, आलकाबाई घाणे, कमल घाणे, चेअरमन कृष्णा कडाळी, प्रकाश कोरडे, दिपक भागडे. दिलीप भागडे. तुकाराम लांडगे. मारुती खाडे, चिंधु घाणे, रामजी आढार. तुकाराम कडाळी. हरिश्चंद्र घाणे. दादाभाऊ लोटे. यादव कडाळी. जालिंदर भागडे. नामदेव घाणे. ग्रामविकास अधिकारी गभाले. वसंत घाणे. चेअरमन भवारी साहेब.संभाजी लांडगे. जाखेरे सर. राजु भवारी. विठ्ठल भवारी.
सुनील पवार सह परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


