इतर

केशरचना’ व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये भर घालते – सौंदर्यतज्ञ अश्विनी संगा कुरापाटी

.

पद्मशाली सखी संघम’ तर्फे ‘महिलांसाठी केशरचना’ कार्यशाळा संपन्न …….

सोलापूर : प्रत्येक सणांच्यानिमित्ताने किंवा कार्यक्रमात महिलांना नटने भारी हौस असते. घरातील कामांबरोबर स्वतःला वेळ देणे महत्वाचे आहे. स्त्रिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील प्रत्येक कामांसह सदस्याची काळजी घ्यावे लागते. त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे असून घरच्या घरी नटने महत्वाचे आहे. प्रत्येकवेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे म्हणजे पैशांचा व वेळेचा अपव्यय होतो. म्हणून केशरचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावेत. यामुळे स्वतःचाच फायदा होतो, त्यासोबत स्वतःच्या चेह-यानुसार ‘केशरचना’ केल्याने चेहरा खुलून दिसतोच, त्यामुळेच सौंदर्यामध्येही भर पडते. असे सौंदर्यतज्ञ अश्विनी संगा कुरापाटी यांनी पद्मशाली सखी संघम’च्या वतीने हेअर स्टाईल (केशरचना) कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी सांगितले .

सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघम’च्या वतीने पूर्व भागातील यल्लालिंग मठाजववळील सुवि सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता नडीमेटला, माजी नगरसेविका राधिका पोसा, रोझा पिस्के आणि पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले

अश्विनी संगा कुरापाटी यांनी झालेल्या कार्यशाळेत एकूण ५ प्रकारात केशरचना शिकवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहखजिनदार हेमा मैलारी, खजिनदार गीता भूदत्त यांनी स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सविता येदूर यांनी केले. यावेळी सचिव रुचिरा मासम, सहसचिव वनिता सुरम, समन्वयिका पल्लवी संगा, सदस्या पद्मा मेडपल्ली, रुचिता मार्गम, पद्मशाली युवक संघटनेचे माजी सचिव मनोज पिस्के उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सदस्य वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली आदींचे सहकार्य मिळाले.
‘———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button