महाराष्ट्र

“प्रेम कथेवर आधारित सरगम” चित्रपट १४ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार

पुणे व भंडारादरा परिरात झाले चित्रपटाचे चित्रीकरण

अकोल्याचे सुपुत्र एम. के. धुमाळ, प्रसाद पुसावळे, महेंद्र केसरी हे आहेत निर्माते

अकोले प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांना नेहमीच एक खास स्थान आहे. काही कथा मनाला स्पर्श करतात, काही अंतर्मनात थांबून राहतात, तर काही कथा मनाचा हरवलेला सूर पुन्हा जागवतात. अशाच भावना, नात्यांची नाजूक विण आणि संगीतमय लय घेऊन “सरगम” हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये. प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे डॉ. शिव कदम यांनी ज्यांनी प्रेम, वेदना, अंतर्मनातील गोंधळ आणि मनाचा स्वर पुन्हा सापडण्याचा प्रवास अत्यंत सूक्ष्म आणि संवेदनशीलतेने शब्दबद्ध व चित्रबद्ध केला आहे.

चित्रपटाची एक विशेष ओळख म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, विचारवंत, साहित्यिक गिरीश कार्नाड यांच्या हयातीतला हा अखेरचा चित्रपट. कथा वाचताक्षणी त्यांनी हा चित्रपट स्वीकारला आणि आपल्या संपूर्ण कलात्मा समर्पणाने भूमिका साकारून सरगम मध्ये एक अविस्मरणीय भावस्पर्शी ठसा उमटवला.

चित्रपटात ऋत्विक केंद्रे मुख्य नायकाच्या भूमिकेत पदार्पण करतो आहे. त्याच्या समोर दिशा परदेशी मनाच्या शांततेतून उगवणारा निरागस अभिनय घेऊन येते.

ही कथा आहे श्रीमंतीच्या आवरणाखाली भावनांनी थकलेल्या, ‘कंडक्ट डिसऑर्डर’ शी झुंज देणाऱ्या एका तरुणाची आणि डोंगरांच्या कुशीत, निसर्गाच्या श्वासात, भावनांच्या भाषेत जगणाऱ्या आदिवासी मुलीची.

कथेतील भावनिक घनता आणि अभिव्यक्तीला समर्थ साथ देतात यतिन कारेकर, सुमीत पुसावळे, रूपलक्ष्मी शिंदे, सुधीर निकम, संजय भुरे, भक्ती धुमाळ आणि कुणाल गौड यांसारखे अनुभवी आणि उत्साही कलाकार.आहेत
आजची तरुण पिढी घरातील दडपणांमध्ये, न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि नात्यांतल्या शांत अंतरांमध्ये हळूहळू अस्थिर होत जाते. ही चूक मुलांची नसते; मौन मोठ्यांचे असते. आणि हे मौन हळूहळू नात्यांचा स्वर विस्कटू लागते.

सरगम ही वेदना समजून घेते, नाव देते, आणि समाधानाकडे नेते. म्हणूनच हा चित्रपट पालक आणि मुलांनी एकत्र बसून अनुभवावा असा आहे.

संगीत: अविनाश–विश्वजीत गीत: गुरु ठाकूर, स्पृहा जोशी, विश्वजीत जोशीस्वर: आदर्श शिंदे, रोहित राऊत, आनंदी जोशी, जशराज जोशी यांचे आहे

निसर्ग पात्र म्हणून कळसूबाई, भंडारदरा, रतनगड व घाटघर लोकेशन्स यात आहेत , ते कथेला श्वास देतात. शांतता, धुके, वारा, पावसाचा स्पर्श हे चित्रपटात भर घालतात


हा कलर लाईन आर्ट्स या बॅनरचा पहिला चित्रपट. निर्माते प्रसाद पुसावळे, महेंद्र केसरी आणि मच्छिंद्र धुमाळ या तिघांनी या चित्रपटाला सिनेमॅटिक दर्जा, विस्तृत दृश्यभव्यता आणि सुबक निर्मिती मूल्य दिले आहे. १४ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये.प्रदर्शीत होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button