कोकणवाडी ता अकोले येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात .

श्री विठोबाचे नामाने संसाररूपी भवसागर पार करता येतो.- ह.भ.प. रोषणीताई घारे
एस. के. जाधव./ प्रतिनिधी
कोकणवाडी दि. २५ अकोले तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी गावात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. विठोबा रुख्मिणी व भैरवनाथ यांची पुजा करून घटस्थापना करण्यात आली. श्री लक्ष्मण दुंदा जाधव आणि लक्ष्मण ठका बेंडकोळी यांनी विनापुजन करून सप्ताहाला सुरुवात झाली.
सायंकाळी ह.भ.प. भिमा हरी इदे यांच्या मार्गदर्शना खाली समस्त गावकरी आणि भजनी मंडळाने हरिपाठ घेतला व आरती झाली. त्यानंतर वार्ड क्र.१ मधील पहारेकऱ्यांनी सर्व भाविकांना गोड संत भोजन दिले. रात्री ठिक ९ वाजता ह. भ.प. रोषणीताई घारे यांनी ” सत्य साचे खरे l नाम विठोबाचे बरे । येणे तुटती बंधने | उभयलोकी किर्ती जेणे॥” या संत तुकाराम महाराज यांच्या नामाचे महत्व प्रतिपादन करणाऱ्या अभंगावरती सुश्राव्य असे किर्तन केले.

किर्तनातून ताईंनी संसारी लोकांना नामाचे महत्त्व पटवून सांगितले. श्री विठोबाचे नाम घेतल्यानंतर संसाररूपी भवसागर पार करता येतो. तसेच मायेची सारी बंधने तुटतात व माणूस बंधनातून मुक्त होतो व जगात किर्ती मिळवतो हे सांगताना संत तुकाराम, संत जनाबाई, भक्त प्रल्हाद यांचे दृष्टांत दिले. आपल्या सुरेल आवाजात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी काळुस्त्याचे श्री रामदास घारे, नंदिनी घारे, तबला विशारद हेमंत घारे, पखवाज विशारद महेंद्र घारे व भजनी मंडळ तसेच भिमा हरि इदे, लक्ष्मण दुंदा जाधव, एकनाथ वाळू जाधव, हार्मोनियम वादक विष्णू जाधव, देवराम जाधव, मृदुंगाचार्य वाळीबा जाधव, रामदास जाधव, संतु दत्तु जाधव, मिराबाई तळ पाडे, सरपंच सौ. सुलोचना जाधव, बाळू जाधव, गुलाब गोडे, दिलीप बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोळी, विठ्ठल बेंडकोळी, महादर्पनचे प्रतिनिधी शिक्षक श्री संतु जाधव उपस्थित होते.



