दारूबंदी असणाऱ्या राजुर गावात अवैध देशी- विदेशी दारूचा साठा पकडला
पोलिसांचा राजूरमध्ये अवैध दारू गुंत्यांवर छापा
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर गावात दारूबंदी असली तरी देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री चालू आहे शासनमान्य दारूची दुकाने बंद करून शासनाचे मोठे नुकसान होत असतील तरी अवैध दारूच्या व्यवसायातून मात्र अनेकांचे उखळ पांढरे होत आहे अनेक वेळा दारू अड्ड्यांवर छापे मारले जातात मात्र पुन्हा हे व्यवसाय सुरू होतात तेच तेच आरोपी पुन्हा दारू विक्री व्यवसाय करतात या मागचे कोडे मात्र उलगडत नाही ज्याप्रमाणे अवैध दारूची विक्री होते त्याचप्रमाणे गांजा जुगार, मटका यासारख्या खेळातही अनेक कुटुंब बरबाद होत आहे लोकप्रतिनिधींच्या गावातच हा छापा काट्याचा खेळ सुरु आहे
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजूर पोलिसांनी छापा टाकून ही अवैध दारू पकडली
राजूर पोलिसांनी राहुलनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एका संशयिताला रंगेहात पकडण्यात आले त्याच्याकडून १२ हजार ७०० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सहायक निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे आणि शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला.
संजय अदालतनाथ शुक्ला (वय ४५, रा. राजूर, ता. अकोले) हा त्याच्या घराच्या भिंतीच्या आडोशाला बॉक्स घेऊन बसलेला आढळला. पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह
एकूण १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित संजय शुक्ला याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
————



