इतर

नेप्तीत कृषी विभागामार्फत ‘महाविस्तार ए.आय.’ ॲप मार्गदर्शन,शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


अहिल्यानगर प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिररात आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या ‘महाविस्तार ए.आय.’ ॲप डाऊनलोड व वापरासंदर्भात मार्गदर्शन तसेच मोफत फेरोमन ट्रॅप वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी दिली.
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, खर्चात बचत व्हावी तसेच कीड व रोग व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करता यावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गटाला कीड व्यवस्थापनासाठी कृषी विभागाच्यावतीने मोफत फेरोमन ट्रॅपचे वाटप सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, अनुदान योजना, पीक संरक्षण उपाययोजना तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध लाभांची सविस्तर माहिती दिली. तसेच आत्माचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक श्री. उमेश डोईफोडे यांनी ‘महाविस्तार ए.आय.’ ॲपविषयी माहिती देत, या ॲपच्या माध्यमातून पिकांची माहिती, कीड व रोगांचे निदान, हवामानाचा अंदाज, शासकीय योजना तसेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला कसा मिळतो, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, आत्माचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक उमेश डोईफोडे, श्रीकांत जावळे, सिंजेंटा फाउंडेशनचे याकुब शेख, कृषीमित्र अजय कर्डिले, आसिफ सय्यद, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, बाबासाहेब होळकर, बाबासाहेब चौरे, रावसाहेब पुंड, व्हा. चेअरमन सादिक पवार, सुरेश कदम, दिलीप पवार, सुखदेव नरवडे, बाबासाहेब रावळे, शेखर रावळे, कल्याण कानडे, गोरख जपकर, दशरथ कोल्हे, रामदास कर्डिले, भाऊसाहेब जपकर, बबन सय्यद, संभाजी कांडेकर, आदिनाथ होळकर, रंगनाथ तनपुरे, कानीफ होळकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button