इतर

टाकळी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

अकोले :- “समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली” या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व महान शिक्षणतज्ञ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती अर्थात राष्ट्रीय बालिका दिन तथा महिला मुक्ती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून टाकळी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. शोभा भरीतकर उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समितीकडून कर्तृत्ववान महिला म्हणून आदर्श केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे, बचत गट कार्यकर्त्या शोभा भरीतकर, पद्मावती सुर्वे, परिघाताई फोडसे, सविताताई वारुंघुसे, टाकळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी साबळे, अंगणवाडी सेविका विद्या तिकांडे, उपक्रमशील शिक्षिका संगिता धिंदळे, युवा स्वयंसेविका निता लेंभे, मदतनीस कमल चासकर, छाया नाईकवाडी, सुरेखा घोलप यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेकींना गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राला उजाळा दिला. शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोहनपुरीचे मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी केले तर सहशिक्षक दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख, कैलास झोळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. टाकळी शाळेने राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे देवठाण बीट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button