विखे पाटील फाउंडेशन चे दिव्यांगासाठी कार्य अतुलनीय :- सुनिताताई भांगरे

अकोले प्रतिनिधी
: दिव्यांगाच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद खूप महत्वाचा असून तो निर्माण करण्याचे काम विखे पाटील फाउंडेशन ने केले आहे हे कार्य अतुलनीय आहे असे मत अगस्ती साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे यांनी व्यक्त केले.
अकोले येथे अगस्ती विद्यालयात दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत सहाय्यक साधनांचे तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अकोले एज्युकेशन संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अगस्ती शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतिश नाईकवाडी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष शरद नवले, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस रेश्मा गोडसे, दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, खंडू वाकचौरे आदी उपस्थित होते.

सौ सोनाली नाईकवाडी यांनी अकोले तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत आवश्यक सहाय्यक उपकरणे पोहोचवून त्यांचे जीवन सुलभ बनविण्याचे काम ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील, यांनी केले आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विखे पाटील फाउंडेशन चे विकास वाकचौरे यांनी सूत्रसंचालन संतोष कोकणे यांनी तर आभार भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सुनील गमे, संतोष कोकणे, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अनाप, राजाराम वाकचौरे, भाजयुमो चे जिल्हा सचिव सुशांत वाकचौरे, दिव्यांग सेल चे बाळासाहेब धुमाळ, संतोष वाकचौरे यांनी विशेष सहकार्य केले.
======



