इतर

महिला दिनानिमित्त मा.खासदार मेघाताई कुलकर्णी यांचे हस्ते महिलांचा सन्मान

संजय उकिरडे

पुणे – पुणे येथे स्मार्ट सखी ग्रुपतर्फे महिला दिनानिमित्त मा.खासदार मेघाताई कुलकर्णी यांची खास उपस्थिती.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यसभा खासदार मा. सौ. मेधाताई कुलकर्णी उपस्थित होत्या.


मा. मेधाताई कुलकर्णी या अनुभवी व अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी दीर्घकाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.


महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी त्या कटिबद्ध आहेत.त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे.त्या प्रभावी वक्त्या असून विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करतात.राज्यसभा सदस्य म्हणून त्या जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देतात.
त्यांच्या नेतृत्वात अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले गेले आहेत. साधेपणा व कर्तव्यनिष्ठा ही त्यांची खास ओळख आहे.समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांना त्या नेहमी प्रोत्साहन देतात.त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. मा. पायल जोशी व मा. सुजाता गुरव यांनाही यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले. संगीत, समाजकार्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. कार्यक्रमात हिंदी-मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा सादर करण्यात आला. उपस्थित कलाकारांनी सुंदर गायन सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली.स्मार्ट सखी ग्रुपच्या संचालिका वृषाली महाजन आणि सीमा सुंतार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. तसेच महिलांच्यासक्षमी करणाबाबत
मार्गदर्शन करताना समाजात महिलांचे योगदान मोठे असून त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमामुळे महिलांच्या कला व कर्तृत्वाला एक व्यासपीठ मिळाले. आभार वासंती वायचळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button