पिंपळगाव खांड ता अकोले येथे वीर महाराज मंदिर कलषारोहन सोहळ्याचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
सुमारे 50 लक्ष रुपये खर्चून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य असे ग्रामदैवताचे मंदिर उभारले आहे. पिंपळगाव खांड (तालुका अकोले ) येथील वीर महाराज हे गावचे ग्रामदैवत आहे
या ग्रामदैवताच्या जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला कोणत्याही आमदार खासदाराकडे हात न पसरता अवघ्या काही दिवसातच या ठिकाणी संपूर्ण लोकवर्गणीतून सुमारे 50 लक्ष रुपये खर्च करून भव्य असे मंदिर उभे केले आहे या नूतन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडत आहे या कार्यक्रमाचे यानिमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव पार पडत आहे
सोमवार दि.३०/०३/२०२६ ते गुरुवार दि.०२/०४/२०० पर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला आहे या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे
– ह.भ.प. अरुणनाथजी गिरी महाराज यांच्या हस्ते सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ७.०० वा. घटस्थापना व मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा पार पडणार आहे
श्री. विर महाराज मुर्तीचे आगमन भव्य मुर्ती मिरवणूक व होमहवन सोहळा पार पडणार आहे
या कार्यक्रमात किर्तनकार ह.भ.प.किशोर महाराज खरात ह.भ.प.विशाल महाराज खोले
ह.भ.प.भरत महाराज जोगी ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे
गुरुवारी दि 2 एप्रिल रोजी सायं. ७ ते ९ वा. रामगीरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे
शुक्रवार दि.०३ एप्रिल २०२६ सकाळी ९.०० ते १२.०० काठीची भव्य मिरवणूक व यात्रा पार पडत आहे तर रात्री ९.०० वाजता जय मल्हार प्रस्तुत मातोश्री उद्योग समुह निर्मित ‘ शुक्राची चांदणी हा ऑर्केस्ट्रा करमणूक कार्यक्रम पार पडणार आहे
या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विरमहाराज देवस्थान,तसेच पिंपळगाव खांड , शिदवड, ढगेवाडी,शेरेवाडी ग्रामस्थांनी केले आहे
=======


