इतर

नेप्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी,

डॉ.आंबेडकरांच्या विचारामुळे परिवर्तन – सरपंच संजय जपकर

अहिल्यानगर/ प्रतिनिधी

– नगर तालुक्यातील नेप्ती येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोसायटी सदस्य सुरेश कदम व सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम, सरपंच संजय जपकर व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी गावातील नागरिक, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
या कार्यक्रमात सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण, संघटन व जागरूकता आवश्यक असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले. .

. “शिकून संघटित होण्याची गरज आहे,” या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाची आठवण करून देत त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आजही समाजासाठी मोठे महत्त्व असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात आली . . . “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होऊन अन्यायाविरुद्ध संघटित लढा उभारणे ही काळाची गरज आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे सामाजिक परिवर्तन शक्य झाले असे प्रतिपादन सरपंच संजय अशोक जपकर यांनी केले.
पुढे बोलताना सरपंच संजय जपकर म्हणाले की म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क आणि संधी प्राप्त झाली आहे. या विचारांचा अंगीकार करून आपण सामाजिक एकात्मता आणि बंधुता वाढवली पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणे आवश्यक आहे.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला सरपंच संजय अशोक जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, माजी सरपंच संजय जपकर , सोसायटी सदस्य सुरेश कदम, सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम, रामदास फुले , चेअरमन सुरेंद्र होळकर, माजी चेअरमन विलास जपकर, माजी उपसरपंच दादू चौगुले ,जालिंदर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर ,ज्ञानेश्वर जपकर, उमर सय्यद, अशोक जपकर, राजेंद्र जपकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यात आली. शिक्षण, संघटन आणि मानवतेच्या मूल्यांची कास धरून समाज परिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. नेप्ती गावात साजरी झालेली ही जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश देणारी ठरली. . . . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button