संगमनेर च्या राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आसोपा तर उपाध्यक्षपदी ओझा

संगमनेर प्रतिनिधी
राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त मंडळाची बैठक दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विविध पदांवरील बदल एकमताने करण्यात आले.
या बैठकीत विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली. स्वर्गीय सुरेश काका जोशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदासाठी हा निर्णय घेण्यात आला.
तसेच, याच बैठकीत जगदीश मंदिर निर्माण समितीची स्थापना करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी श्री. अभिजीत सुरेशचंद्रजी जोशी
यांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाचे हे पुरातन मंदिर असून त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. सदर काम अधिक गतीने व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या बैठकीस विश्वस्त मंडळाचे खजिनदार श्री. ओंकार तिवारी, सचिव श्री. मनोज साकी तसेच सदस्य श्री. सतीश खंडेलवाल, श्री. रवी जोशी, श्री. ओंकार जोशी, श्री. श्यामसुंदर जोशी, श्री. कैलास पंचारिया, श्री. नरेंद्र ओझा आणि श्रीमती राजेश्वरी ओझा उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील ताज्या घडामोडी साठी
हा ग्रुप जॉईन करा 👇👇👇


