आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘मनातलं पानावर’ या पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.

संगमनेर : भुदरगड साहित्य भूषण व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार समारंभ नुकताच गारगोटी कोल्हापूर येथे पार पडला. संगमनेर येथील व्यंगचित्रकार व लेखक अरविंद गाडेकर लिखित ललित कथा संग्रह ‘मनातलं पानावर ‘ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते म्हणाले,” आज आपण ज्या घटना पाहतो,वाचतो त्यावेळी मन सुन्न होते,अशावेळी लेखकांनी लिहिते झाले पाहिजे. नाकारत्मक वातावरण बदलण्यासाठी सकारात्मक लेख,कविता या माध्यमातून लेखकांनी लिहावे. राज्यभरातून लेखक,कवी यांनी लिहिलेल्या साहित्यातून उत्कृष्ट साहित्यिकांची निवड अक्षर साहित्य मंच गारगोटी यांनी केली आहे.लेखकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे चांगले काम केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई हे होते आणि प्रमुख पाहुणे ‘गोष्ट पैश्या पाण्याची ‘या रेकॉडब्रेक विक्री झालेल्या पुस्तकाचे लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे हे होते.कुलदीप राजे,सहआयुक्त भारतीय राजस्व सेवा हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र भरातून १९ सहित्यिक या पुरस्कार सोहळ्यास उपस्थितीत होते.
अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ.अर्जुन कुंभार आणि संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.
१५० वर्षापासून सुरु असलेले श्री शाहू वाचनालय,गारगोटी येथे हा समारंभ मोठया दिमाखात पार पडला.
या पुरस्काराबद्दल अरविंद गाडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



