इतर

आदिवासी सेवक डॉ. पोपेरे यांचा पंजाब विधानसभेत सन्मान!

एस. के. जाधव / प्रतिनिधी


अकोले दि. ३० पंजाब विधानसभा सचिवालय चंदिगड यांच्या वतीने भारत विभूषण सन्मान 2026 पंजाब राज्य विधानसभेमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या सन्मान कार्यक्रमाला पंजाब राज्य विधानसभा अध्यक्ष ना श्री.सरदार कुलजर सिंग , व विधानसभा उपाध्यक्ष ना.श्री.सरदार जय किसान सिंग , व ना.श्री राम लोक खयना , सेक्रेटरी पंजाबी विधानसभा सचिवालय ना. श्री.सरदार सुरेंद्र सिंग मोती, सेक्रेटरी विधानसभा अध्यक्ष पंजाब राज्य श्री.अभिषेक गिलार , अधिविष्ट ज्वेलर जयपुर राजस्थान, मा. संस्थापक अध्यक्ष भारत श्री डॉ. अतुल शर्मा , मा. सेक्रेटरी श्रीमती रेणू गुप्ता मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदिवासी सेवक तथा भारत नेपाळ मैत्री फोरम भारत देश उपाध्यक्ष नवी दिल्ली डॉ. व्ही.व्ही.पोपेरे यांना राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय समाजकार्याची दखल घेऊन पंजाब राज्या विधिमंडळ सचिवालय यांच्यावतीने पंजाब राज्य विधिमंडळ अध्यक्ष यांच्या हस्ते भारत विभूषण सन्मान 2026 पंजाब राज्य विधिमंडळामध्ये प्रदान करण्यात आला.

डॉ.पोपेरे यांचे महाराष्ट्र राज्य व संपूर्ण देशांमध्ये नवतरुणांना एक नवीन प्रेरणा व दिशा देणारे कार्य आहे. त्यांचे समाजाप्रती फार मोठे योगदान आहे या कार्यक्रमाकरीता संपूर्ण देशांमधून व विविध राज्यातील काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पंजाब विधानसभा चंदीगड येथे संपन्न झाला.
डॉ. पोपेरे यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button