उत्पादन शुल्क उपायुक्त डॉ. निलेश सांगडे यांचे पोस्ट-डॉक्टोरल संशोधन पूर्ण!

अकोले दि, 31जुलै
बृहन्मुंबई विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त डॉ. निलेश सांगडे यांनी आपली पोस्ट-डॉक्टोरल (Postdoctoral) पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (DYPIMS), पुणे येथून त्यांनी हे उच्चस्तरीय संशोधन यश संपादन केले.
डॉ. निलेश सांगडे यांनी यापूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. पीएचडीनंतर व्यवस्थापन क्षेत्रातील पुढील उच्चस्तरीय संशोधनासाठी त्यांनी डॉ. नितीन वैद्य यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री क्षेत्रातील डॉ. वैद्य यांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि संशोधनाकडे पाहण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन यामुळे डॉ. सांगडे यांच्या पोस्ट-डॉक्टोरल संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
अकोले तालुक्याचे सुपुत्र मॅनेजमेंट एक्स्पर्ट डॉ. नितीन रावसाहेब वैद्य,डॉ. अविनाश पवार यांचे त्यांना मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.
अनुभवी व्यवस्थापन तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य यांचा समन्वय साधत डॉ. सांगडे यांनी हे उच्च संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले.

उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात घडणाऱ्या या उल्लेखनीय कामगिरीचे शैक्षणिक तसेच इंडस्ट्री वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.
डॉ. निलेश सांगडे यांच्या या यशाबद्दल वत्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत


