इतर

संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने कोतुळ येथे त्रिदिनी  हरीनाम सप्ताह आयोजन

कोतुळ प्रतिनिधी 

कोतूळ, ता.अकोले, जि. अहिल्यानगर येथील संत सावता महाराज मंदिरात त्रिदिनी  हरीनाम सप्ताहचे आयोजन केले आहे 

ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव व ह.भ.प.नितीन महाराज गोडसे, ह.भ.प. हिम्मत महाराज माळी यांचे मार्गदर्शनाखाली  रविवार दि. ०९.०८.२०१६ रोजी या सप्ताह  सोहळायची सुरवात होईल तर  मंगळवार दि. ११.०८.२०२६  रोजी सांगता होईल 

या दरम्यान च्या काळात काकडा आरती – पहाटे ४ ते ६ वा. नेमाचे भजन- दुपारी २ ते ३ वा.  हरिपाठ – सायं. ५.३० ते ६.३० वा.  हरिकीर्तन- रात्री ७ ते ९ वा.  हरिजागर- रात्री १० ते १२ वा. असा दैनिक कार्यक्रम पार पडणार आहे 

ह.भ.प. आत्माराम महाराज बटवाल (जुन्नर) ह.भ.प. ओंकार महाराज बाबर ( अहिल्यानगर ).ह.भ.प. वाल्मिक महाराज गिते ( नाशिक )ह.भ.प. अनंत महाराज काळे (मेंढवन) यांचे  किर्तनाचे कार्यक्रम होणार आहे मंगळवार दि. ११.०८.२०२६ रोजी दुपारी २ ते ५ वा. भव्य पालखी सोहळा होईल.

 या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संत सावता महाराज तरुण मित्र मंडळ श्री संत सावता महाराज सप्ताह नियोजन समितीचे वतीने करण्यात आले  आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button