इतर

अकोले तालुक्यातील अवैध दारू,जुगार – मटका बंद करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी

दीपावली सणाच्या च्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील त अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी अकोले तालुका आर.पी.आय.चे युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे

अकोले तालुक्यातील राजुर पोलीस स्टेशनं आणि अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे
उत्पादन शुल्क व पोलीस खाते केवळ कारवाईचा बडगा दाखवतात मात्र कारवाईनंतर पुन्हा त्या ठिकाणी अवैध दारू जुगार, मटका, व्यवसाय सुरू होतो खेड्यापाड्यांमध्ये सुरू असलेल्या या अवैद्य व्यवसायामुळे बेरोजगार तरुणांची मोठी संख्या दारू जुगार, मटका, या व्यसनांच्या आहारी जातं आहे यामुळे गावा गावांतील सामाजिक व कौटुंबिक वातावरण दूषित होत आहे अकोले व राजुर पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्याची केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते. छापा कारवाई होण्यापूर्वीच संबंधितांना याची कल्पना दिली जाते आणि संगमने मताने केवळ तकलादू कारवाई करण्यात येते अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैद्य व्यावसायिकांमध्ये मुजोरी वाढत चालली आहे
अवैध व्यावसायिक,पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या एकमेकांच्या हातात हात घालून सुरू असणारे हे व्यवसाय तातडीने बंद करावे. या अवैध व्यवसायामुळे दिवाळीत सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी तातडीने या व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर.पी.आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे या बाबत आपण लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले

======

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button