इतर

10 वी.च्या मुलांच्या निरोप समारंभात रानकवींच्या कवितांना बहर…!


अकोले- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रतनवाडी युनिट-मुतखेल ता.अकोले.जि.अहिल्यानगर येथील इ.10 वी. च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवार दि.13/02/2026 रोजी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मारुती मोहरे व उपाध्यक्ष श्री.विजय इदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

या कार्यक्रमास मुतखेल गावच्या सरपंच श्रीमती दिपालीताई रोंगटे या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण इ.3 री.व इ.9 वी.च्या मराठी पुस्तकातील रानवेडी व वनवासी या कवीतेचे कवी रानकवी तुकाराम धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.दिपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर कार्यक्रमात या शैक्षणिक वर्षांतील विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मानवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात इ.10 वी. च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार, डोंगरू बारामते,निसर्गकवी गणेश गायकवाड व इतर मान्यवरांनी शुभेच्छापर आपले विचार मांडले.तर रानकवी तुकाराम धांडे यांनी आपल्या विविध कविता सादर करून मुलांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.10 वी.च्या विद्यार्थीनी व श्रीम.अर्चना नाडेकर व वर्षा पोटकुले यांनी केले तर कार्यक्रमासाठी श्री.जनार्दन मगर,सुजाता झेंडे,विठ्ठल आडे,सतिश भांगरे,सोनवणे, बोडखे,बाबासाहेब लोंढे,रंजित बागुल, नंम्रता शिंदे,जगदिश बेळगे,लता मेश्राम, सुषमा खाडे ,रामदास मडके,विजय खाडे.यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री.जगदिश बेळगे यांनी ऊपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button