आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२८/११/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०७ शके १९४५
दिनांक :- २८/११/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १४:०६,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति १३:३१,
योग :- सिद्ध समाप्ति २२:०३,
करण :- तैतिल समाप्ति २५:५७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राहू(व)-मीन २४:४१,
केतु(व)-कन्या २४:४१,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:०३ ते ०४:२७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:१७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१७ ते ०१:४० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०३ ते ०४:२७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि, व्दितीया श्राद्ध,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०७ शके १९४५
दिनांक = २८/११/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
शारीरिक दृष्टया सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.
वृषभ
शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.
मिथुन
कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.
कर्क
जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.
सिंह
नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या
पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.
तूळ
कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.
वृश्चिक
पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.
धनू
कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.
मकर
कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.
कुंभ
काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.
मीन
कौशल्याने वागाल. व्यापार्यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर