ग्रामीण

भारजवाडी शाळे च्या पार्थ कराड ची सैनिक स्कुल साठी निवड!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेले भारजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक चा विद्यार्थी पार्थ कराडची सैनिक स्कुल साठी निवड झाली भगवान गड परिसरातील ऊसतोडणी कामगाराची पंढरी असलेल्या भारजवाडी गावातील हनुमान नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा तो विद्यार्थी आहे

नुकत्याच झालेल्या सैनिक स्कूल एट्रान्स परीक्षेमध्ये पार्थ कराड याने २३४ गुण मिळवत सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवला आहे
सैनिकी स्कूल साठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवले असून त्याची सैनिकस्कूल साठी निवड झाल्याने ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता भरलेली असते मात्र त्यासाठी योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज असते

पार्थ ला सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठी पलाटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले इयत्ता चौथी पर्यंत तो हनुमान नगर भारजवाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला या शाळेत त्याचा पाया पक्का झाला असे त्याचे वडील महादेव कराड यांनी सांगितले.
त्याच्या या यशामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लहू बोराटे सहशिक्षक राघू जपकर यांनी सैनिक स्कूल एट्रान्स परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्ता भाषा सामान्य विज्ञान इत्यादी विषयांची तयारी करून घेऊन पार्थ कराड याला मार्गदर्शन केले, पार्थ कराड यांच्या यशाबद्दल भगवानगड परिसरातुन त्याचे कौंतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button