इतर

आदिवासी शेतकऱ्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत 24 एकर जमीन वाटप

सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश;

दत्ता ठुबे

पारनेर/प्रतिनिधी :
आदिवासी बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे माझे कर्तव्य होते. वन हक्क कायद्याअंतर्गत जमीन मिळाल्याने या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल. शासनाच्या या योजनेला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमच्या प्रयत्नांचा खरा पुरस्कार आहे,” असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील पोखरी पवळदरा येथील 12 आदिवासी भूमीहीन शेतकऱ्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येकी दोन एकर अशा एकूण 24 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले. या जमिनींच्या वाटपाचे प्रमाणपत्र वितरण समारंभ पोखरी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी विश्वस्त किसनराव धुमाळ, सरपंच हिराबाई पवार, उपसरपंच झुंबराबाई पवार, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, म्हसोबा झापचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आहेर, युवा नेते सतीश पवार, सरपंच संजय काशीद, ज्येष्ठ नेते निजाम पटेल, इंजि. प्रसाद झावरे, पोखरी सेवा सोसायटीच्या संचालिका जयश्री शिंदे, बाबुराव पवार, संतोष ढोकळे, अशोक पवार, आनंदा केदार, रोहिदास शिंदे, नामदेव कारंजेकर, राहुल मधे, मन्सूर पटेल, भूमिपुत्रचे अन्सार पटेल, पोपट कसबे, युवा नेते अमीन पटेल, प्रकाश पवार, तुषार पवार, दत्ता वाकळे, अमोल पवार, संजय कारंजेकर, गोरख फरतारे, गणेश पवार, रामदास पवार, रावसाहेब पवार, महेंद्र शिंदे, अन्वर शेख, मुन्नावर सय्यद, रोहिदास दरेकर, विक्रम पवार, सुभाष वाकळे, पंढरीनाथ खैरे, संजय कोकाटे, अनिल शिंदे, जयश्री पवार, स्वाती पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सुजित झावरे पाटील यांनी आदिवासी शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आमच्या गावातील 12 कुटुंबांना जमीन मिळाली, ही खूप मोठी उपलब्धी आहे. या जमिनीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होईल. आम्ही झावरे यांचे आभार मानतो आणि भविष्यातही त्यांच्याकडून असेच सामाजिक कार्य अपेक्षित आहे.

सतीश पवार

(सामाजिक कार्यकर्ते, पोखरी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button