भंडारदरा येथील टपरीधारकांना जलसंपदा बजावली नोटीस७ ऑगस्टपर्यंतची मुदत :व्यावसायिकांनी दिले निवेदन
अकोले प्रतिनिधी
भंडारदरा येथील जलसंपद विभागाच्या जागेतील टपरीधारकांना जलसंपदा विभागाने अतिक्रमणा बाबत
नोटिसा बजावल्या आहेत. गुरुवार (दि. ७) ऑगस्टपर्यंत टपऱ्या हटविण्याचे या नोटिशीद्वारे सूचित केले आहे.
जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २७ जुलै रोजी भंडारदरा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या जागेतील अतिक्रमणे हटविण्याबाबतचे आदेश दिले होते.
नोटिसा मिळताच स्पीलवेजवळील टपरीधारक, सामाजिक कार्यकर्ते अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर, रामदास पिचड, सोमनाथ रोंगटे, लालू इदे, राजू इदे, शरद इदे, मोहन खाडे आदींची बैठक झाली.
या बैठकीत दिवंगत माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आम्हाला आदिवासी उपाययोजनेतून उपजीविकेसाठी टपऱ्या व पर्यटकांना जलविहार करण्यासाठी बोटी दिल्या
भंडारदरा जलसंपदा विभागाच्या जागेत अतिक्रमण करण्यात आलेल्या ६८ अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे
काढण्याबाबत आदेश बजावण्यात आले आहेत. यात शेंडी येथील जैन मंदिराच्या बाजूची ३३, मच्छी मार्केट परिसरात १५ तर स्पीलवेजवळील २० टपरीधारकांचा
समावेश आहे.
आदिवासी तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे प्रकल्प कार्यालयातून आदिवासींनी आदिवासी उपयोजनेतून रोजगार निर्मितीचे टपऱ्यांच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहे यातून पर्यटनाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला रोजी रोटी मिळाली आहे आणि ती रोजी रोटी हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधव सहन करणार नाही तर त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारू असा इशारा आरपीआयचे अकोले तालुका युवा अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे
आदिवासी बेरोजगारांना पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी स्थान उपलब्ध करून द्यावे, पर्यटन विकास आराखड्यात स्थानिक आदिवासी युवकां ना प्राधान्य देण्यात यावे, धरणग्रस्तांना अद्याप मिळालेल्या हक्कांचा योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्या येईल, असा इशारा देण्यात आला आहे
दिलेल्या नोटिशी तत्काळ मागे घ्याव्यात याबाबतचे लेखी निवेदन टपरीधारकांनी भंडारदरा जलसंपदा विभागाला दिले आहे



