इतर

श्रीक्षेत्र काकनेवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह व पर्जन्य यज्ञाचे आयोजन


पारनेर प्रतिनिधी:-


पारनेर तालुक्यातील अध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचे असणाऱ्या श्री क्षेत्र काकनेवाडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉ.कृष्णकृपंकित हभप डॉ.मिसाळ महाराज व डॉ.जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह पर्जन्य यज्ञ व संत बहिणाबाई गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे काकडा भजन, सकाळी 8 वा.पारायण, नंतर गाथाभजन, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन व 7 ते 9 हरिकीर्तन नंतर महाप्रसाद व नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन आहे.
आयोजित केलेल्या सप्ताहमध्ये हभप सवणे महाराज, सदगीर महाराज, येवले महाराज, डॉ.मिसाळ महाराज,हभप वाव्हळ महाराज,उगले महाराज,जामगांवकर महाराज व हभप कांबळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहची सांगता होणार आहे.
या अखंड हरीनाम सप्ताह मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डॉ.मिसाळ महाराज लिखित संत तुकाराम चरित्र ग्रंथ गवराम शेठ वाळुंज यांच्या सौजण्याने भेट देण्यात येणार आहे.
कृष्ण जन्माच्या दिवशी रात्री 9 ते 10 वेळेत विद्यार्थ्यांचे “गोडी अभंगाची”या कार्यक्रमातर्गत अभंग गौळण गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
तसेच उपस्थित भाविकामधून दरोरोज 5 भाविकांना वृक्षमित्र भगवान शेठ वाळुंज यांच्या सहकार्याने आंब्याचे वृक्ष वाटप करण्यात येणार आहे.
दि.12/8/2025 रोजी दत्तात्रय शेठ नवले व नानासाहेब झावरे तसेच सर्व मुंबईकर मंडळी यांच्या विशेष सहकार्याने पर्जन्य यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पर्व काळात सर्वांनी अन्नदान आणि ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भजनी मंडळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button