अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पारनेर तालुकाध्यक्षपदी प्रा. पांढरे तर महिलाध्यक्षपदी पवार

पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सर्व सामान्य ग्राहकांच्या प्रशासकीय अडीअडचणी सोडवण्यासाठी पारनेर तालुका ग्राहक पंचायतची जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर )यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली
.यावेळी पारनेर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पारनेर तालुकाध्यक्षपदी गांजीभोयरे येथील प्रा.शहाजी यादव पांढरे तर पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता राजाराम पवार यांची महिलाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी सर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार भगवानराव गायकवाड,कोषाध्यक्ष डॉ.अप्पासाहेब नरोडे, जिल्हा ग्राहक मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी,संघटक बाळासाहेब कोकाटे, पर्यावरण प्रमुख अरुण कुलट आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये उपाध्यक्ष अरुण पांडुरंग रोहकले, सचिव दत्तात्रय नारायण औटी, उपाध्यक्ष बाबाजी ठूबे, सहसचिव मच्छिंद्र नगरे, कोषाध्यक्ष चंद्रकांत साहेबराव चतर, ग्राहक मार्गदर्शन प्रमुख लक्ष्मण सदाशिव चेमटे, गुन्हे विभाग प्रमुख दगडू शेरकर,सचिव मीनाताई करंकडे, कार्यकारणी सदस्य सौ.पोपळघट, देवदत्त साळवे, नरेश सोनवणे, ठकाराम शिवाजी खोडदे यांची निवड करण्यात आली आहे.



