इतर

कोहंडी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी.

:-संयुक्त राष्ट्र संघटनेचे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावानुसार 9 ऑगस्ट 1994 पासून जगात व आपल्या देशात ९ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन मधून साजरा केला जातो. जि. प .शाळा व ग्रामपंचायत कोहंडी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच हिराबाई तातळे., ग्रामसेवक भैरवनाथ नाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख परते पोलीस पाटील मधुकर देठे ग्रामपंचायत सदस्य विनायक परते,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ,शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक विकास कडाळी यांनी स्वतंत्र चळवळीतील आदिवासींचे योगदान ,आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीचे योगदान खूप महत्त्वाचे होते पण इतिहासात मात्र त्यांची नावे नाहीत. ब्रिटिशांच्या जुलमी व अन्याय राजवटीविरुद्ध लढा दिला. सहशिक्षक यानंतर ज्ञानेश्वर डगळे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. सहशिक्षिका आशा जाधव यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट केलं.
यानंतर शाळेपासून ते ग्रामपंचायत पर्यंत प्रभात फेरी काढून ग्राम पंचायत जवळ मुलांचे भाषणे, आदिवासी क्रांतिकारक व पोशाख, वेशभूषा घालून यांच्यासह विविध प्रकारची गाणी झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष सुधाकर किरवे व उपाध्यक्ष वनिता पोटे , सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामस्थ ,पालक,उपस्थित होते.
यावेळी ,राजू परते, पांडूरंग तातळे आत्माराम तातळे,योगेश तातळे,संजय तातळे, राजेंद्र परते, हरिदास परते,बुधा गवारी,मच्छिंद्र परते,बबन पोटे,रामू परते,किशोर किरवे,शंकर तातळे, देवराम पिचड,पांडूरंग परते, रामदास परते, देवराम पिचड,दिपक मेमाणे . रामदास बांगर, समाधान किरवे सखूबाई कचरे,सुलोचना किरवे, आशा तातळे,रंजना तातळे,,भिमाबाई तातळे,गिता किरवे, रूपाली तातळे .विमल किरवे,अश्विनी गवारी, सोनाली गवारी,इत्यादी महिला पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता होऊन आभार प्रदर्शन संतोष तातळे यांनी केले.

——-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button