इतर
प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पारनेर येथे रक्षाबंधन

पारनेर प्रतिनिधी
आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून रक्षाबंधन सणाला फार महत्व दिले जाते हा उद्देश ठेवून पारनेर शहरातील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मधील संचालिका साधना दिदी यांच्या संकल्पनेतून पारनेर शहरातील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पारनेर केंद्र येथे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला

यावेळी पारनेर अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात संघाचे आमदार काशीनाथ दाते ( सर) आणि भाजपचे नेते वसंतराव चेडे यांना अतूट बंधनाची राखी बांधण्यात आली यावेळी ब्रह्मकुमारी साधना दिदी, हिराबाई मगर दिदी, आवारी सर, एकनाथ औटी, राम भाई,बबन खोडदे आदी सेवकवर्ग उपस्थित होते.



